सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- राहाता तालुक्यात सर्वदूर रिमझीम पावसाने हजेरी लावली आहे. रिमझीम पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.

यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळले आहे. ऐन थंडीतच राज्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामासाठी शेतक-यांची लगबग सुरू आहे. अनेक शेतक-यांनी कांदा, हरबरा, गहू व ज्वारीची पेरणी केली आहे.

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. औषध फवारणीचा खर्च देखील वाढला आहे.

अनेक शेतक-यांनी अद्याप पेरण्या केलेल्या नाहीत त्यांनाही पोषक वातावरणासाठी वाट बघावी लागणार आहे.

पेरू, द्राक्ष, बोर आदी फळपिकांना देखील या वातावरणाचा फटका बसत आहे. फळांची गुणवत्ता टिकवण्यासाठी शेतक-यांना कसरत करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe