अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- राज्य सरकारने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा घेतलेल्या निर्णयाला विरोध होताना दिसून येत आहे. यातच भाजपने हा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे.
यातच आता खासदार सुजय विखे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलीय. शिर्डी मतदार संघातील माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी कोणत्याही किराणा दुकानात मद्य विक्री करू देणार नाही असल्याचे प्रतिपादन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
यामुळे आता या निर्णयाबाबत पुढे काय होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. लोणी (ता. राहाता) येथील एका कार्यक्रमाचं उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. सुजय विखे म्हणाले की, संसदेत मी गोरगरीब व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने पोहोचलो आहे. गोरगरिबांची बाजू संसदेत माडण्याचे कर्तव्य मी सातत्याने करीत राहणार असून माझ्या या भूमिकेमुळे कोणाला काही त्रास होत असेल तर त्याची मी काळजी करणार नाही.
किराणा दुकानात मद्य विक्री करण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अतिशय दुर्दैवी असून या निर्णयाला माझा ठाम विरोध आहे.
जर किराणा दुकानात कोणी मद्य विक्री करताना आढळून आल्यास त्या दुकानदाराचे दुकान सिल करून त्याला मोठा विरोध केला जाईल असा इशारा डॉ विखे यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम