शेतकऱ्यांची कांदा लागवड खोळंबली

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :- महावितरणच्या देवगाव उप केंद्रावरून दिला जाणारा फत्तेपूर फिडर अंतर्गत कौठा परिसरातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा शनिवार व रविवार दोन दिवसांपासून किरकोळ कामासाठी बंद केल्याने शेतकऱ्याबरोबर कांदा लागवड करणाऱ्या मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कांदा लागवडीसाठी दोन दिवस मजूर शेतावर बसून राहिले. यामुळे झालेले नुकसान कोण भरून देणार? असा सवाल उपस्थित केला जातो. कारण बिबट्याच्या भीतीमुळे रात्रपाळी कृषिपंप बंद राहतात आणि महावितरणच्या गलथान कारभारामुळे आर्थिक फटका बसला असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

नेवासे तालुक्यातील देवगाव सब स्टेशनवरून कौठा व परिसरातील शेतकऱ्यांना फत्तेपूर फिडर अंतर्गत वीज पुरवठा केला जातो. ऐन दिवस पाळीच्या वेळात विजेचे दुरुस्तीचे काम महावितरण किरकोळ कामे करताना शेतीच्या नुकसानीची काळजी घेत नाही.

आणि मग शेतकऱ्यांना रात्री, अपरात्री वीज देऊन शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. फत्तेपूर शिवारात विजेचा एक खांब पडल्याचे समजले.

तो उभा करण्यासाठी वीज वितरणला दोन दिवस लागल्याने कांदा लागवड करणारे मजूर दोन दिवस शेतावर बसून राहिले. देवगाव उपकेंद्राच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी वैतागून गेला. दिवसाचा वीज पुरवठा कधीच सुरळीत मिळत नाही. यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe