भाविकांसाठी खुशखबर ! शिर्डीच्या साई मंदीरात लाडू प्रसाद भाविकांसाठी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- श्री साईबाबा मंदिर प्रशासनाच्या वतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना प्रसादरुपी बुंदीच्या लाडू पाकिटांची विक्री नुकतेच सुरु करण्यात आली आहे.

द्वारकामाई समोरील नाट्यगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्यात आलेले आहे.श्री साईबाबा संस्‍थानच्‍या मार्फत सन १९९० पासुन श्री क्षेत्र शिर्डी येथे येणारे साईभक्‍तांना तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची आदिंचा समावेश करुन बुंदीच्‍या लाडूची प्रसाद स्‍वरुपात विक्री केली जाते.

देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते.

त्‍यामुळे सशुल्‍क लाडू प्रसाद पाकीट विक्री पुर्णत: बंद करण्‍यात आले होते. राज्य शासनाने 7 ऑक्टोबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते.

परंतु जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून संस्थानचे साई प्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्यात आलेले होते.दरम्यान दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी पासुन श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात आलेले आहे.

तसेच कोविड 19 चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्पादन पुनश्च सुरू करण्यात येवून नुकतेच 9 डिसेंबरपासुन लाडू प्रसाद विक्री सुरु करण्यात आलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe