डीटीएड धारकांसाठी खुश खबर ! ‘या’ महिन्यात होणार टीईटी परीक्षा

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar news : शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सरकारने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा घेतली. टीईटी परीक्षा राज्य सरकार आणि सीटीईटी परीक्षा केंद्र सरकार घेते. या परीक्षेत उत्तीर्ण होणारे उमेदवार पात्र मानले जातात आणि सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी नियुक्त केले जातात.

त्यानुसार यंदा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. यात परीक्षेत दोन पेपर असून सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिली आहे.

आपण सरकारी शिक्षक व्हावे आणि अध्यापन क्षेत्रात आपले भविष्य घडवावे, असे अनेकांचे स्वप्न असते. शिक्षक होण्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत आणि अनेक प्रकारच्या शिक्षक भरती परीक्षाही आहेत.

शिक्षक पात्रता परीक्षा ही देखील सरकारी शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी परीक्षा आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये घेतली जाते .

त्यानुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ संदर्भात परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र राज्यात इ. १ ली ते ५वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित / विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ सप्टेंबर २०२४ पासून सुरू झाली आहे. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे. परीक्षेचे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. अर्ज भरणे, शुल्क याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहन उमेदवारांना परीक्षेला तात्पुरता प्रवेश देऊन निकाल घोषित केला जाईल. परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांची पडताळणी प्रमाणपत्र वितरणावेळी करण्यात ति प्रमार्ण असल्यास किया उमेदवार प्राप सादर करू न शकल्यास भीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

असे असेल या परीक्षेचे वेळापत्रक – या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ९ सप्टेंबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ असणार आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दि. २८ ऑक्टोबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ एवढा कालावधी मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe