अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- खून, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म अॕक्ट असे 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार चार वर्षांपासून पसार होता.
दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने या गुन्हेगाराची कुंडली काढून श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूरच्या चौकातच त्याला बेड्या ठोकल्या.
राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय 26 रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे या जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यात हद्दीत तब्बल 17 गंभीर गुन्हे त्याच्याविरूद्ध दाखल आहेत.
लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी चव्हाण हा आपल्या बेलापूर या गावी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.
त्यानुसार शाखेचे एक पथक पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार संपत खंडागळे,
पोलीस हवालदार बापू फोलाणे, पोलीस नाईक भिमराज खर्से, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे यांनी बेलापूर येथे जात सराईत गुन्हेगार चव्हाण याला अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम