अरे बापरे : एकाच कुटुंबातील चौघांनी विष घेवून..? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  एकाच परिवारातील चार जणांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विष घेतल्यामुळे त्यांना येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या परिवारामधील कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी या सर्वांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना श्रीरामपूर शहरातील गोंधवणी कॅनल परिसरात घडली आहे.

याबाबत कामगार रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर रवींद्र जगधने यांनी सांगितले की, विष घेतलेले संबंधित चौघांना पुढील काही तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.

दरम्यान या घटनेमुळे गोंधवणी परिसरासह श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली असून नेमक्या कोणत्या कारणामुळे या संपूर्ण परिवाराने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत अधिक माहिती पोलिस घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe