अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- शिवसेना महिला आघाडीने संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद केले.
शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुरेखा गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे दुकान बंद करण्यात आल्याने शिवसेनेतील मतभेद उघडकीस आले आहेत. दरम्यान संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरातील कुरण रोड येथे हे देशी दारुचे दुकान अनेक वर्षांपासून सुरू होते.

कोणताही नाहारकत दाखला नसतांनाही हे दारूचे दुकान खुलेआम सुरू होते. या दुकाना बद्दल वेळोवेळी तक्रारी करूनही राज्य उत्पादन शुल्क का कारवाई करत नव्हते शिवसेना महिला आघाडीकडे या देशी दारुच्या दुकाना बाबत तक्रार करण्यात आली.
यानंतर मुंबई येथील शिवसेनेच्या पदाधिकारी गव्हाणे या सनामनेरात आल्या. त्यांनी रुद्रावतार धारण करत हे दुकान बंद केले. दुकान पुन्हा सुरू झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यानंतर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना निवेदन देऊन या दुकानांवर कारवाई करण्याची मागणी केली.
काही वर्षांपूर्वी या देशी दारुच्या दुकानाला सील लावण्यात आले होते. दारू उत्पादन शुल्क अधिकार्यांशी आर्थिक तडजोड झाल्यानंतर हे दुकान पुन्हा सुरू करण्यात आले असा आरोप गव्हाणे यांनी या निवेदनाद्वारे केला आहे.
या देशी दारुच्या लायसनला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसताना लायसन सुरु कोणी ठेवले त्या अधिकार्यांवर कारवाई करावी व सदरचे लायसन त्वरित बंद करावे. अशी मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम