अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुलाखती घेतल्या आहेत.
शिर्डी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या मुलाखतीमध्ये यंदाची निवडणूक लढविण्याची तयारी असणार्या आजी-माजी नगरसेवकांसह नव्याने इच्छुक असलेल्या सुमारे 300 व्यक्तींनी मुलाखती दिल्या आहेत.
खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्या उमेदवारांसाठी शनिवारी शिर्डी येथील संपर्क कार्यालयात मुलाखती ठेवल्या होत्या.
दुपारी 3 वाजेपासून मुलाखती सुरू झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत या मुलाखती सुरु होत्या. जवळपास तीनशेच्या दरम्यान इच्छुकांनी खा. सुजय विखे पाटील यांच्यासमोर मुलाखती दिल्या आहे.
यावेळी अनेक दिग्गज मातब्बर व प्रस्थापित पुढारी मुलाखत देण्यासाठी संपर्क कार्यालयाच्या बाहेर उभे होते. मुलाखतीच्या कालावधी दरम्यान संपर्क कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.
त्यामुळे शिर्डी नगरपंचायत निवडणुकीची यंदाची राजकीय रणधुमाळी चांगलीच रंगतदार होणार असल्याचे संकेत दिसून येत आहे.
निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून आपल्याला आपल्या पक्षीय नेतृत्वाकडून उमेदवारीचा ग्रीन सिग्नल लवकर मिळावा याच प्रतीक्षेत आता मुलाखती दिलेले उमेदवार दिसून येत आहे.
17 जागांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्याने आता त्यातून कोण कोणाला ग्रीन सिग्नल मिळतो हे बघणे मात्र मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम