शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेतात हे दुर्दैवी : माजी आमदार पिचड यांची टीका

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2022 :-  आज शेतकरी उदध्वस्त झाले आहेत. आधी दुष्काळ, अतिवृष्टी नंतर कोरोना, शेती मलाला भाव नाही, म्हणून कर्ज डोक्यावर. अशा परिस्थितीत महावितरणने हद्दच केली आहे.

शेतकरी संकटात असताना त्यांना साथ देण्याऐवजी त्यांचीच वीज बंद केली. कंपनी एकाला एक न्याय तर दुसऱ्याला एक न्याय देते. सगळा अनगोंदी कारभार सुरु आहे. पुर्ण दाबाणे वीज मिळत नाही.

वीज कधीही येते जाते. शेतकरी वाऱ्यावरच सोडले आहेत. अशी टीका माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. अकोले तालुक्यातील वीज बिल थकबाकीमुळे सुमारे ५५० रोहित्रांचे कनेक्शन कट केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने

महावितरणच्या कार्यालयावर माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे पाच तास ठिया आंदोलन करण्यात आले.

यावेळी ते म्हणाले आज तालुक्यात सुमारे पाचशेच्या वर रोहीत्र बंद आहेत. उभी पिके जळत आहेत. पण हे सरकार ढिम्म आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी तर केवळ बघ्याची भुमिका घेत आहेत.

गेल्या दोन वर्षात तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलीही नुकसानभरपाई मिळालेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe