Kopergoan News : कोपरगावातील पूल व रस्त्यांसाठी ४६ कोटी निधी मंजूर

Ahmednagarlive24 office
Published:
Kopergoan News

Kopergoan News : गेल्या चार वर्षात कोपरगाव मतदारसंघातील रस्त्याची दुरवस्था दूर करून दळणवळण पूर्व पदावर आणण्यात आ. आशुतोष काळे हे यशस्वी ठरले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.

त्यांनी पुन्हा एकदा मतदारसंघातील रस्त्यांसाठी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गुरूवारी ४६.४६ कोटी व १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी २८.८४ कोटी निधी मिळवल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील शहराला जोडणाऱ्या रस्त्यांचे बांधकाम आणि छोट्या पुलांसाठी निधी मिळावा, यासाठी महायुती शासनाकडे प्रस्ताव दाखल केले होते.

या मागणीची दखल घेवून महायुती शासनाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काल गुरूवारी शहरासह तालुक्यातील विविध पुलासह रस्त्यासाठी सुमारे ४६.४६ कोटी निधी दिला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयाला देखील २८.८४ कोटी निधीची तरतूद झाली आहे.

आरोग्य व्यवस्था किती कमकुवत होती, हे वैश्विक कोरोना महामारीने दाखवून दिल्यामुळे आ. काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाबरोबरच आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.

जिल्हा रुग्णालय मतदारसंघापासून जवळपास १०० किलोमीटर दूरवर असून जिल्ह्याच्या उत्तर भागात एकही उपजिल्हा रुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.

त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून २८.८४ कोटी निधी मंजूर करून घेतला होता. त्या निधीची देखील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तरतूद करण्यात आल्यामुळे

कोपरगाव शहरात लवकरच सर्व सुविधायुक्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe