अहमदनगरमधील कोपरगाव येथे कोल्हे-काळे यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी! स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर का नेली? गोरक्षनाथ जामदारांची विवेक कोल्हेवर टीका

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरांमध्ये मात्र आमदार आशुतोष काळे आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचे  दिसून येत आहे.

Published on -

Ahmednagar News:- विधानसभा निवडणूक आता जशी जशी जवळ येत आहे तशी तशी राज्याच्या राजकीय वातावरणामध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झळू लागल्या आहेत तसेच राजकीय वातावरण गरम झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अगदी याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण देखील या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापदायक झाल्याच्या आपल्याला दिसून येत असून

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरांमध्ये मात्र आमदार आशुतोष काळे आणि जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगल्याचे  दिसून येत आहे. नुकतेच विवेक कोल्हे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन काही मुद्द्यांना धरून आरोप केले होते व त्यालाच आता कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी कोल्हेंचे नाव न घेता उत्तर दिले आहे.

 गोरक्षनाथ जामदार यांनी कोल्हेंना दिला हा इशारा

विधानसभा निवडणुका आल्यामुळे चुकीचे आरोप करून तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यामुळे आरोप करताना जरा जपूनच करा. स्मार्ट सिटी कुणी तालुक्याच्या बाहेर आणि कशासाठी नेली यासाठी जमिनीचे उतारे दाखवायची वेळ येवू देऊ नका, असा इशारा कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांना नाव न घेता दिला.

आमदार आशुतोष काळे यांच्यावर विवेक कोल्हे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना जामदार यांनी म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांनी ३ हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणला. या निधीतून झालेली कामे व प्रगतीपथावर असलेली कामे जनतेला दिसत आहे. मात्र ज्यांच्याकडे विकासाची दृष्टीच नाही. त्यांना हा विकास कधीच दिसणार नाही.

आजपर्यंत त्यांच्याकडे चाळीस वर्ष असतांना त्या चाळीस जेवढा निधी आला. त्यापेक्षा कित्येक पटींनी आमदार काळे यांनी या पाच वर्षांत निधी आणला.शहराच्या पाणी प्रश्नावर आजवर ज्यांनी आपली दुकानदारी चालवली, त्यांची ती दुकानदारी पाच नंबर साठवण तलावामुळे कायमची बंद पडली. त्यामुळे यापुढे राजकारण करायचे तरी कशावर असा प्रश्न विरोधकांना पडला.

त्यांना आमदार काळे यांच्यावर टीका करून कुठेतरी चर्चेत राहायचे आहे. आमदार आशुतोष काळे यांनी ओक दशकापासूनचे प्रलंबित असलेले विकासाचे प्रश्न सोडवून दाखवले. हे विरोधकांना पचनी पडत नसल्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ सुरू असून चुकीचे आरोप करून गरळ ओकली जात आहे. आपल्या मातोश्री सत्तेचा वापर करून स्मार्ट सिटी तालुक्याच्या बाहेर घेऊन गेल्या.

त्या ठिकाणी कुणाच्या जमिनी आहेत, हे जमिनीच्या उताऱ्यावरून सिद्ध झाल्यास तुम्हाला तोंडघशी पडावे लागेल. त्यामुळे उगाच चुकीचे आरोप करू नका. टीका करून मतदार संघात झालेला विकास झाकता येणार नाही. मात्र, आपल्या असलेल्या कलेक्शन एजंटच्या स्मार्ट सिटीच्या जवळच्याजमिनीचे उतारे जर लोकांपर्यंत पोहोचले तर तोंडघशी पडाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe