आ. आशुतोष काळे यांचे हात आणखीनच बळकट! तिळवण तेली समाज या निवडणुकीत आ.काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार

कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे रिंगणात असून त्यांना शहरातील आणि मतदारसंघातील विविध समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे

Ajay Patil
Published:
ashutosh kale

Ahilyanagar News:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे हे रिंगणात असून त्यांना शहरातील आणि मतदारसंघातील विविध समाज घटकांकडून मोठ्या प्रमाणावर या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे व त्यांनी देखील आता प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग घेतला असून नागरिकांशी संवाद साधने तसेच प्रचार फेऱ्या या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहे.

सध्या त्या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार आशुतोष काळे यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.

या अनुषंगाने जर आपण बघितले तर कोपरगाव शहरातील तिळवण तेली समाज बांधवांची बैठक आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली व यावेळी या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन तिळवण तेली समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी केले.

आ.आशुतोष काळे यांना तिळवण तेली समाजाचा पाठिंबा
तिळवण तेली समाजाच्या मागण्या घेऊन ज्या ज्या वेळी मी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे गेलो. त्या त्या वेळी कधीही रिकाम्या हाताने परत आलो नाही. शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या मंदिरासाठी आमदार आशुतोष काळे यांचे मोलाचे योगदान आहे व त्यामुळे आपल्या अडचणी सोडवणाऱ्या आमदार काळे यांच्या पाठीशी मतदार संघातील तिळवण तेली समाज उभा राहणार असल्याचे तिळवण तेली समाजाचे नेते व राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रमेश गवळी यांनी सांगितले.

कोपरगाव मधील तिळवण तेली समाज बांधवांची बैठक आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली व यावेळी आमदार काळे यांनी समाजासाठी केलेल्या भरीव सहकार्यातून उतराई होण्याकरिता या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी बोलताना रमेश गवळी यांनी म्हटले की,तालुक्यामध्ये कुठेही श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांचे मंदिर उभारलेले नव्हते. त्यामुळे मागील तीन दशकांपासून कुठेच श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची जयंती कार्यक्रम व इतर सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सांस्कृतिक भवन उपलब्ध नव्हते.

तिळवण तेली समाजाने गेल्या पाच वर्षांपूर्वी जागा खरेदी केली होती.परंतु त्या ठिकाणी मंदिर आणि सभागृह कसे उभारायचे हा एक मोठा प्रश्न होता.

हा प्रश्न सोडवण्यासाठी तिळवण तेली समाज बांधवांनी आमदार काळे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मंदिर आणि सांस्कृतिक भवनाचा प्रश्न मांडला असता दहा लाखांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe