Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सन 2024-25 या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ नुकताच पार पडला व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे हे होते.
यासोबतच चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या पत्नी शकुंतला चव्हाण यांच्या हस्ते या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले व या कार्यक्रमाप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील असा कुठलाही प्रकारचा भेदभाव न करता 2023-24 ला गळीतास जो काही ऊस आलेला होता त्या उसाचे अंतिम पेमेंट 125 रुपये प्रति मॅट्रिक टनाप्रमाणे देण्याचा जो शब्द दिलेला होता तो पूर्ण केला आहे
व हे पेमेंट 14 ऑक्टोबरला दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर कारखान्याचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना देखील 20% दिवाळी बोनस देण्याची घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी बोलताना केली.
14 ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस अंतिम दराचे 125 रुपये होणार वर्ग
कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील असा भेदभाव न करता २०२३-२४ ला गळितास आलेल्या उसाला अंतिम पेमेंट १२५ रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. १४ ऑक्टोबरला दिवाळीपूर्वीच ऊस उत्पादकांच्या खात्यात हे पेमेंट जमा करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांनाही २० टक्के बोनस देण्याची घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी केली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत व्हाईस चेअरमन शंकरराव चव्हाण व त्यांच्या पत्नी शंकुतला चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी आमदार काळे बोलत होते.आमदार काळे पुढे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी व कामगार यांना अग्रस्थानी ठेवून त्यांना न्याय देण्याची कर्मवीर शंकरराव काळे यांची शिकवण आहे. त्यानुसार वरील निर्णय घेतला आहे. महायुती शासनाने ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा निर्णय घेऊन त्याला मंजुरी दिली आहे.
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. आपल्यावर सातत्याने अन्याय होत असल्यामुळे सुरू असलेल्या गोदावरी अभ्यास गटाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळेल.
गोदावरी कालव्यांचे रोटेशन वेळेत होईल. कारखान्याची गाळप क्षमता वाढलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ऊस कार्यक्षेत्रातून उपलब्ध व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले, तर संचालक सचिन चांदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.