अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- लोणी, राहुरी आणि शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहनांची चोरी करणार्या टोळीला लोणी पोलिसांनी गजाआड केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील मणियार गल्लीतून 12 नोव्हेंबर रोजी फिरोज बशीर मणियार यांचा पिकअप किराणा सामानासह घरासमोरून चोरी झाला होता.
याबाबत लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुउन्हा दाखल झाल्यानंतर सहा. फौजदार मरभळ हे तपास करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर पिकअप खंडाळा, ता. श्रीरामपूर येथे असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी फारुख हसन सय्यद याला पिकअपसह ताब्यात घेतले. आरोपीने साकुरी येथील साईल पांडुरंग बनसोडे आणि शिर्डी येथील दौलत यशवंत कदम यांच्याकडून पिकअप घेतल्याची कबुली दिली.
लोणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले व चोरी झालेला पिकअप, 4 हजार 360 रुपयांचे किराणा सामान हस्तगत केले. या आरोपींनी राहुरी पोलीस ठाणे व शिर्डी पोलीस ठाणे येथून चारचाकी वाहने चोरल्याची कबुली पोलिसांपुढे दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम