अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- अकोले नगरपंचायतसाठी 4 प्रभागांतील 4 मतदान केद्रांतील 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदान केले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
दरम्यान मतदानाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंगळवार दि 18 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरूवात झाली. सुरूवातीला काही वॉर्डात कमी वेग होता.

मात्र दुपारनंतर मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. अकोले नगरपंचायतच्या 4 प्रभागांतील एकूण 3137 मतदारांपैकी 2526 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याने एकूण मतदान 80.52 टक्के झाले आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते, आघाडीच्या उमेदवारांसाठी तर भाजपचे माजी आमदार वैभवराव पिचड व भाजपाचे पदाधिकारी दिवसभर शहरातील प्रभागात ठाण मांडून बसलेली होती.
आता या 4 प्रभागातील सर्व उमेदवारांचे मतदान मतपेटीत (मशिनमध्ये) बंद झाले असून आता आज दि. 19 जानेवारी रोजी मतमोजणी आहे.
विधानसभा निवडणूकीनंतर ही नगरपंचायत निवडणूक अतिशय प्रतिष्टेची मानली जात असून या निवडणुकीवर पुढील निवडणुकांचे भवितव्य अवलंबून असणार असून याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- .