नाफेडने दिले हमीभाव तुर खरेदीचे आदेश; जाणून घ्या प्रतिक्विंटल दर –

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-   हमीभाव तुर खरेदी साठी नाफेडने आदेश दिले आहेत. नेवासा तालुक्यातील ज्यांच्याकडे तुरीचे पीक आहे त्यांनी आपली ऑनलाइन नाव नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.(market rates)

शासनाने यावर्षी तुर पिकास 6 हजार 300 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देण्याचे जाहीर केले असून त्यासाठी नाव नोंदणीस प्रारंभ झाला आहे.

नाफेड व महा एफपीसी यांच्या माध्यमातून ही हमीभाव खरेदी प्रक्रिया सुरु होत आहे. शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज नोंदल्यावर खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी केव्हा तुर आणायची याची माहिती एसएमएसद्वारे शेतकर्‍यांना दिली जाईल.तरी नेवासा तालुक्यातील तुर उत्पादकांनी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे… सातबारा उतार्‍यावर तूर पिकाची नोंद व तलाठ्याची सही, आधार कार्ड, बँक खात्यास जोडलेला मोबाईल नबर, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक घेऊन शेतकरी कंपनीच्या भेंडा येथील कार्यालयात तुर उत्पादकांनी नाव नोंदणीसाठी अर्ज भरुन द्यावेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe