Newasa News : लिफ्टची मागणी करत, धाक दाखवून मारहाण ! अखेर रस्तालुट करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

Ahmednagarlive24 office
Published:
Newasa News

Newasa News : लिफ्टची मागणी करत, धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीला येथील नेवासा पोलिसांनी नुकतेच गजाआड केले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी बंडु विटकर ( रा. नेवासा फाटा),

दत्तात्रय ज्ञानेश्वर भुजंग (रा. मुकिंदपूर, नेवासा फाटा), अमोल पुंजाराम मांजरे (रा. झोपडपट्टी, नेवासा फाटा), गणेश कचरू भुजंग (रा. मुकिंदपुर, नेवासा फाटा), अशी आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून चोरी केलेला एक मोबाईल, ७०० रुपये रोख व फिर्यादीचे आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स जप्त करण्यात आले आहे. अनिकेत कृष्णा सोनगिरे व साक्षीदार परवेज फकरु शेख हे रविवारी (दि. १५) दुपारी पावने तीन वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथून आयशर टेम्पोमध्ये फरशी भरून आव्हाणे (ता. शेवगाव, जि. अहमदनगर ) येथे खाली करुन पुन्हा रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास नेवासा फाटामार्गे येत होते.

त्यावेळी वाहन चालक परवेज फकरु शेख याला चार इसमांनी पॅसेंजर म्हणून हात केला. त्यांनी या चार इसमांना आपल्या वाहनामध्ये बसवले व छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने टेम्पो निघाला. दरम्यान या चार इसमांनी दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली व वाहन औदुंबर हॉटेलजवळ थांबवून चालक शेख याच्या खिशामधील १० हजार ६०० रुपये तसेच फिर्यादी अनिकेत कृष्णा सोनगिरे यांच्या खिशातील आधारकार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स काढुन घेतले.

त्यानंतर फिर्यादीस आणखी मारहाण करु लागल्याने त्यांनी वाहनातून उडी मारली व ते पळून गेले. वाहनचालक परवेज शेखदेखील टेम्पो घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघून गेले. सोनगिरे यांनी पोलिसांशी संपर्क केला असता नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले.

पोलिसांनी लागलीच चार इसमांचा शोध घेतला असता, हे चौघे नेवासा फाट्याच्या दिशेने जाताना दिसले. चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या चौघांनी याआधी सोमनाथ दिपक बजागे (रा. पडळवाडी जि. कोल्हापूर) यालाही नेवासा फाटा येथे मारहाण करुन लुटल्याचे समोर आले.

याप्रकरणी नेवासा पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप ढाकणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पोलीस नाईक अशोक लिपने, किरण गायकवाड, संदीप बर्ड, कॉन्स्टेबल संदीप ढाकणे, सुमित करंजकर यांनी केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe