अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच दुरुस्ती साठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कडे केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज (ता. २९) अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक झाली.
या बैठकीत जिल्ह्यात जलसंपदा विभाग राबवित असलेल्या निळवंडेसह सहा योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. नेवासे तालुक्यात असणार कौठा या गावात मुळा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो
त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते याबाबत तोडगा काढण्यासाठी सद्यप्रश्नांकडे माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी मंत्री जयंत पाटील आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
यावेळी घुले पाटील म्हणाले,जायकवाडी धरण होतांना धरणासाठी जमिनी गेल्या त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूर्वसन करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना मुळा धरणाचे 12 माही पाणी देण्याचे सरकारने आश्वासित केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणालाच पाणी मिळत नाही.
मागील वर्षी मुळा धरण 100 टक्के भरून सुद्धा टेलच्या भागात पाणी पोहचले नाही.त्यामुळे नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे
यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 चे नूतनीकरणासाठी 4 कोटी 97 लाख ,टेल डीवायच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 60 लाख रुपये व पाथर्डी ब्रँचच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी 36 लाख असा 9 कोटी 97 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम