अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पेरूपासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत होती.
परंतु गेल्या 3 वर्षांपासून पेरू फळबागांवर विविध प्रकारच्या कीड रोगाने व ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादकांना आर्थिक हानी पोहोचत आहे.
त्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात पेरू उत्पादनासाठी राहाता तालुक्यातील फळबागा प्रसिद्ध समजल्या जात होत्या.
संपूर्ण राज्यातून तसेच देशभरातून पेरू कलम खरेदी करण्यासाठी शेतकरी राहाता येथे येत असे. परंतु गेल्या 3 वर्षापासून ऑगस्ट ते जानेवारी या पेरू काढणीसाठी असलेल्या मुख्य महिन्यात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे.
ढगाळ हवामानामुळे हिरवा आसणारा पेरू पिवळा होतो. परिणामी 25 रुपये प्रति किलो विकला जाणारा हिरवा पेरू 7 ते 8 किलोप्रमाणे विकावा लागतो.
5 ते 6 महिने शेतकर्यांना उत्पन्न देणार्या पेरू फळबागांवर असलेले हिरवे पेरू हे ढगाळ हवामानामुळे पिवळे होऊन लगेचच जमिनीवर पडतात.
त्यामुळे पेरू उत्पादक शेतकर्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. पेरू फळबागांवर येणारा कीड रोग नाहीसा होऊन पुन्हा पूर्वीसारखे पेरूला चांगले दिवस येतील व परिसरातील बाजारपेठ पूर्वीप्रमाणेच फुलेल, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम