Rahata News : ST बसवरील नेत्यांच्या पोस्टरला काळे फासणार

Ahmednagarlive24 office
Published:
Rahata News

Rahata News : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी राहाता बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक राज्य परिवहन मंडळाच्या एसटीला असलेल्या

पोस्टरवरील त्यांच्या प्रतिमेला काळे फासून केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधव सागर सदाफळ यांनी दिली आहे.

याबाबत माहिती देताना सदाफळ म्हणाले, अनेक महिन्यांपासून जरांगे पाटील यांच्या प्रयत्नातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरू आहेत.

राज्य सरकारने जरांगे पाटील यांना आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांचा अवधी मागितली होता, तो उलटूनही सरकारने ठोस निर्णय न घेतल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध जिल्ह्यात, तालुक्यात तसेच गावांमध्ये मोठ्या स्वरूपात उपोषण सुरू आहे. आरक्षण मिळण्यासाठी अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत.

असे असताना राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत नसल्यामुळे राहाता शहरात केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध म्हणून सोमवारी राहाता बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक बसला असलेल्या पोस्टरवरील नेत्यांच्या प्रतिमेला काळे फासणार आहे.

सकल मराठा समाज बांधवांच्या संयमाचा अंत न पाहाता तात्काळ आरक्षण जाहीर करावे. अन्यथा लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सागर सदाफळ यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe