अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे चार दिवस श्रीरामपूर शहरातील दुकाने बंद राहतील अशी अफवा कोणीतरी पसरलव्याने शहरातील व्यापारी हवालदील झाले होते मात्र मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे यांनी याबाबत खुलासा केल्यावर व्यापाऱ्यांचा जीव भांडयात पडला.
श्रीरामपूर शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्रीरामपूर शहरातील सर्व प्रकारच्या व्यापारी व्यावसायिकांनी आपापली दुकाने सलग चार दिवस बंद ठेवावेत, असे आवाहान श्रीरामपूर मर्चट असोसिएशनने केले आहे.
शहरातील नागरिकांच्या हितासाठी तसेच व्यापारी वर्गाच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्याटीने सर्वांनी सर्व प्रकारची कामेंबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आवाहनास सर्वानी १०० टके प्रतिसाद द्यावा अशा आशयाची जाहिरात कोणीतरी सोशल मीडियावर टाकली. त्यामुळे बाजारपेठेत खळबळ उडाली होती.
याबाबत मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोपळे यांचेशी संपर्क साधला असता असा कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसून दुकाने सुरू राहतील असा खुलासा केला.
त्यावर व्यापारी व ग्राहकांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम