अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका 20 ते 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीपरोडवर आढळून आला आहे.
या तरुणाच्या चेहर्यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा असल्याने त्याचा घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, घुलेवाडी शिवारात नाशिक-पुणे महामार्गावरील स्लीप रोडवर एका 20 ते 25 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर तरुणाच्या अंगात काळेपांढरे चौकटीचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, पायात सॅन्डल घातलेला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम