बाळासाहेब थोरात म्हणाले काही देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, काही जण स्वप्नात बडबडत आहे !

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाच्या सोळाव्या वर्षाचा आनंद मेळावा संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील कार डोंगरावर आयोजित करण्यात आला होता.

यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार सदाशिव लोखंडे, दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रकल्पप्रमुख दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे उपस्थित होते.

यावेळी बोलताना थोरात यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले.राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकून राहण्यास आणि चांगले काम करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव हेही एक प्रमुख कारण आहे.

सर्वांना समजून घेत, बरोबर घेऊन चालणारे ते व्यक्तिमत्व आहे,’ अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले महाविकास आघाडीचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे.

हे सरकार पाडण्यासाठी अनेक जण देव पाण्यात ठेऊन बसले आहेत, काही जण स्वप्नात बडबडत आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार नाही.

आघाडीचे सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा मोठा वाटा आहे, हे मान्यच करावे लागेल. सर्वांना समजून घेत, सोबत घेऊन चालणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वामुळेच आघाडी टिकण्यासाठी हातभार लागला आहे.

अनेक संकटे आली, मात्र सरकार डगमगले नाही. करोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री ठाकरे यांचे काम देशात एक नंबरचे ठरले. कोणतीही लपवाछपवी न करता त्यांनी काम केले. ज्यांनी लपवाछपवी केली, ते उघडे पडले. एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे मुख्यमंत्री सर्वांची काळजी घेतात.

त्यामुळेच एकीकडे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घातल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांसह सर्व घटकांची काळजी घेतली जात आहे,’ असेही थोरात म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe