Mahavitaran : सणासुदीच्या काळात विजपुरवठा खंडीत केल्यास आंदोलन

Published on -

Mahavitaran : संगमनेर शहरात सध्या विविध भागात सातत्याने विज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे व्यावसायावर परिणाम होत असून सणासुदीच्या काळामध्ये अखंड विज पुरवठा सुरू ठेवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संगमनेर व्यापारी असोसिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी संगमनेर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, उपाध्यक्ष सुमेध संत, जुगलकिशोर बाहेती, खजिनदार अरुण शहरकर, संचालक प्रमोद मणियार, तुकाराम लालपोत, व्यवस्थापक अविनाश पुलाटे आदी उपस्थित होते.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या सणासुदीचे दिवस आहे. दिपावली सणानिमित्ताने बाजारपेठेत गर्दी होवू लागली आहे. सणाच्या काळामध्ये दरारोज कोणत्याही वेळी विजपुरवठा खंडीत केला जातो.

याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शहरामध्ये, कोणत्याही कारणास्तव विज पुरवठा खंडीत होणार नाही, या बाबतची योग्य ती दक्षता वीज सणासुदीच्या दिवसात वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, परिसरात शहर व परिसरात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी दक्षता घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याने दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe