शिर्डी नगरपंचायत निवडणुक ! पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत २०२१ सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या दिवसा अखेर कोणत्याही उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज जमा केला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली.

२०२१ शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

तर २२ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान नगरपंचायत कार्यालयात दि.१ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२१ पर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत भरून जमा करायचे आहे.

नामनिर्देशन फाँर्म भरावयाची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२१ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.

तसेच दि.५ डिसेंबर रविवारी व दि.६ डिसेंबर सोमवारी सुट्टी आल्याने नामनिर्देशन फाँर्म भरण्यासाठी फक्त ४ दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला आहे.

असे असले तरी देखील उमेदवारास २४ तासांत कधीही आपला आँनलाईन फाँर्म भरता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News