अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- गाईने पाईपलाईन फोडल्यामुळे एका जनास चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी मयुर अनिल भोसले, वय २४ याने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गाईने पाईपलाईन फोडण्याच्या कारणाने मयुर भोसले यांना लाकडी दांड्याने मारहाण केली.
त्यात त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. त्यांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून प्रणव तान्हाजी भोसले, तानाजी कृष्णरात भोसले,
अभयसिंह दाजीसाहेब भोसले व पृथ्वीराज दाजीसाहेब भोसले (सर्व रा. पाटेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचपुते करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम