Shirdi News : मुंबई येथील साईभक्त शशिकला शामराव कोकरे यांनी आपली आई स्व. चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ श्री साईबाबा संस्थान हॉस्पिटल मधील रुग्णाच्या सेवेसाठी २० लाख रूपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर रूग्णवाहिका देणगी स्वरूपात नुकतीच दान स्वरूपात दिली आहे.
याप्रसंगी गाडीची विधीवत पुजा करून शशिकला कोकरे यांचे प्रतिनिधी रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा व विजय तावडे यांनी गाडीची चावी संस्थानचे प्रशासकिय अधिकारी भिकन दाभाडे. राजतिलक बागवे यांच्याकडे सुपुर्द केली. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व वाहन विभाग प्रमुख अतुल वाघ उपस्थित होते.
साईबाबा संस्थानच्या साईनाथ व साईबाबा सुपर हॉस्पिटलकडून प्रतिदिन हजारो रुग्णावर औषध उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. खाजगी वैद्यकीय सेवा महाग झालेली असताना गोरगरिबांना या रुग्णालयाचा मोठा फायदा होत असतो, महाराष्ट्रासह अतिदुर्गम जिल्ह्यासह परराज्यातील रुग्ण देखील याचा मोठा लाभ घेत असतात.
थेट रुग्णांना माफक दरात घरापर्यंत पोहच केले जाते. रुग्णसेवेचा नावलौकिक यामुळे या साईभक्त महिलेकडून हि रुग्णवाहिका जन सेवेसाठी दान स्वरूपात देण्यात आली आहे, असे रविंद्र सुरवसे यांनी सांगितले.