अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शिर्डी देवस्थान आणि तेथील मुद्दे हे चर्चेचे माध्यम बनले आहे. आधीच विश्वस्त मंडळ निवडीवरून न्यायालयाने घेतलेला आक्षेप व त्यानंतर आता साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना नुकतेच न्यायालयाने एक नोटीस जारी केली आहे.
बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बिले परस्पर अदा केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली होती.

याचिकेवर सुनावणी होऊन बगाटे यांना नोटीस काढली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अॅड.अजिंक्य काळे यांनी माहिती देताना सांगितले की, सन 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या एका याचिकेत संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेला केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी दिली होती.
ऑगस्ट 2020 मध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती झाली. बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बीले परस्पर न्याती कन्स्ट्रक्शन व भानू
कन्स्ट्रक्शन व इतरांना अदा केल्याबाबतची माहिती संजय काळे यांना माहितीच्या अधिकारात मिळाली. सदरच्या विषयाबाबत काळेंनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद
येथे उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेवर सुनावणी झाली असून न्यायालयाने बगाटे यांना सदर अवमान याचिकेत नोटीस काढली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













