महाराष्ट्रात कोविडचा प्रादूर्भाव वाढत आहे. दक्षता म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शिर्डी येथील साईबाबा मंदिर प्रशासनाने भाविकांना मास्कची उपलब्धता करून देण्याची सूचना केली. नो मास्क नो दर्शन याबाबतची अंमलबजावणी करावी, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा हा महत्वाकांक्षी उपक्रम संपूर्ण देशभरात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर ठरला आहे.

आयुष्यमान भारत योजनेत अधिकचे काम करून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सामान्यांची अपेक्षापूर्ती करावी, अशी अपेक्षा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
शिर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूल परिसरात विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ विकसित भारत यात्रेच्या माध्यमातून सामान्यांना देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील ५५० गावांमध्ये ही यात्रा पोहोचली आहे. यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी एकसंघपणे काम करण्याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी केले.
मंचावर जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, लोकसभा समन्वयक राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर,
शहर अध्यक्ष सचिन शिंदे, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, भाजयुमोचे अध्यक्ष योगेश गोंदकर, संजय गांधी, निराधार योजनेचे अध्यक्ष डॉ. धनंजय धनवटे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी सतिष दिघे आदींची प्रमुख उपस्थिती होती.