१३ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यामधील निपाणी वडगाव मधील स्वस्त धान्य दुकानदाराला ई-केवायसीच्या वादातून मारहाण केल्याची घटना घडली.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातल्या सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन दिले.
सध्या सगळीकडे धान्य दुकानातून कार्ड धारकांची ई-केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे.त्यामुळे दुकानदार कार्डधारकांना फोन करून बोलावून ई- केवायसी करत आहेत.

दरम्यान श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील सहकारी सेवा संस्थेच्या धान्य दुकानात असलेले सेल्समन गणेश चव्हाण हे आपल्या दुकानात कार्डधारकांची ई-केवायसी करत होते तेव्हा शरद पवार या कार्डधारकाने ई-केवायसीच्या कारणावरून दमदाटी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
तसेच त्याने दुकानदारास मारहाण करायला सुरुवात केली.या घटनेचा निषेध म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचिव रज्जाक पठाण, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, राधाकृष्ण आहेर, राजेंद्र वाघमारे, गणेश चव्हाण, नरेंद खरात, आशिका उबाळे, देवराम गाढे, योगेश नागले, सचिन मानधने, अनिल मानधने, प्रेम छतवाणी
मंगेश छतवाणी, राजेंद्र वधवाणी, संतोष वेताळ, शिवाजी सईद, हनुमान शिंदे, अजिज शेख, आप्पासाहेब शिरोळे, सद्दाम शेख, राजेंद्र वाघ, गोपीनाथ शिंदे, लालाशेठ गदिया, एकनाथ थोरात, परसराम छत्र, अजित शेख, आर. जी. काळे, योगेश गंगवाल, सी. बी. गायकवाड, एस. बी. गवारे आदी उपस्थित होते.