Ahmednagar News : मराठा-कुणबी आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील सभेच्या तयारीसाठी सकल मराठा समाज्याने गावागावात फिरून बैठका घेऊन समाज जागृती करून सभेची जोरदार तयारी सुरू केली आहे.
काल शनिवारी सकाळी तालुक्यातील उक्कलगाव येथील केशवगोविंद मंदिरातून बैठकीला सुरूवात होऊन, बेलापूर, पढेगाव लाडगाव, कान्हेगाव, मालुंजे, भेडापूर, खिर्डी, वांगी, कारेगाव, मातापूर, निपाणी, खोकर, भोकर, टाकळीभान, कमालपूर, भामाठान, माळवाडगाव, मुठेवडगाव, असा दौरा पार पडला.
गावागावात खूप मोठ्या प्रमाणावर लोक येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. आज रविवारी (दि. 19) पासून वडाळा महादेव, शिरसगाव, ब्राम्हणगाव वेताळ, हरेगाव, उंदिरगाव,
माळेवाडी, सरला, गोवर्धन, महांकाळ वडगाव, नाऊर, नायगाव, जाफराबाद, रामपूर, मातुलथान, गोंडेगाव, निमगाव खैरी, भैरवनाथ नगर, दिघी, खंडाळा, दत्तनगर इत्यादी गावांना भेटी देत बैठका घेणार आहेत.