अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दोघा बहिण-भावावर हल्ला करत त्या गंभीररित्या जखमी केले.

येथील नरोडे मळ्या मध्ये राहणारे प्रवीण नरोडे त्याची बहीण पूजा नरोडे हे दोघे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता संगमनेर येथून घरी येत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन हल्ला केला.

दोघे भाऊ बहीण गाडीवरून खाली पडले व बिबट्या त्यांच्या अंगावर धावून गेला असता दोघांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेला.

परंतु पुन्हा त्याने त्यांच्या अंगावर हल्ला करून पूजा नरोडे हिचा पायाला चावा घेत जखमी केले. प्रवीणही जखमी झाला आहे. उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले

मात्र बहीण पूजा ही जास्त जखमी असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवले अाहे. संगमनेर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News