अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2021 :- फिट येऊन खाली पडून एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नेवासा तालुक्यातील लोहारवाडी येथे घडली आहे.(drank too much alcohol … )
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, बाळू मधुकर भोसले वय 34, धंदा-मॅनेजर रा. घोडेगाव यांनी खबर दिली असून त्यात म्हटले की,
नितीन शंकर भोसले (वय 29) रा. लोहारवाडी ता. नेवासा याने दारुचे अतिसेवन केले होते व तो फिट येऊन खाली पडून मयत झाला.
या माहितीवरून सोनई पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक तुपे करत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम