अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर परिसरातील आठवाडी एकलहरे येथे कोंबडी मृत झाल्याने गाडी चालक गाडी बाहेर आला नाही म्हणून त्यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे परिसरात आठवाडी परिसरात एका गाडीखाली कोंबडी चिरडून मेली.
तेव्हा गाडी चालक सय्यद हा गाडीबाहेर आला नाही त्यावरुन तिघांनी सय्यद याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नवाब सय्यद (वय 36) रा. आठवाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर यानी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रविंद्र भानुदास बर्डे,
सपना रविंद्र बर्डे, मंगल नाना बर्डे सर्व रा. आठवाडी, एकलहरे यांच्याविरुद्ध श्रीरामपूरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद रविंद्र भानुदास बर्डे यांनी दिल्यावरुन आरोपी नवाब सय्यद, रा. आठवाडी, एकलहरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम