अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- पाळीव कुत्र्यांवर झडप घेत बिबट्याने फडशा पाडल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
तसेच तालुक्यातील वडाळा महादेव येथील हरेगाव रोड परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असून सध्या बिबट्यासह मादी व ३ बछडे परिसरात फिरत असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, निकमवस्ती येथे बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत त्याला उसाच्या दिशेने फरफटत नेले. यावेळी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी फटाके बाजवून बिबट्यास पळवून लावले.
बिबट्याने पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात मोठी लोकवस्ती असून याठिकाणी अनेक पाळीव जनावरे या परिसरात आहेत.
बिबट्याने यापूर्वीही अनेक जनावरांचा फडशा पाडला असून काही दिवसांपूर्वी परिसरातील सागाच्या झाडांमध्ये बिबट्याची मोबाईलवर क्लिप व्हायरल झाली होतीवन विभागाने या परिसरात तात्काळ पिंजरा बसवावा, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम