नेवासा तालुक्यातील तीन गावांतील तिघेजण झाले बेपत्ता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळ्या दिवशी तीन गावांतील तिघेजण बेपत्ता झाले असल्याची घटना नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील देवगाव येथील अभिजित चांगदेव यादव (वय 26), धंदा-खासगी नोकरी यांनी दिलेल्या खबरीत म्हटले की, 13 जानेवारीपासून माझे वडील चांगदेव लक्ष्मण यादव (वय 59) हे देवगाव येथील घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेले आहेत.

आम्ही त्यांचा नातेवाईकांकडे व इतरत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नाहीत. नेवासा पोलिसांनी मिसींग नोंद केली आहे. दुसरी बेपत्ता घटना दुसर्‍या बेपत्ता व्यक्तीबाबत बाबासाहेब पद्मनाथ गायके (वय 47) धंदा-शेती रा. भालगाव ता. नेवासा यांनी खबर दिली आहे.

खबरीत म्हटले की, 14 जानेवारी रोजी मुलगा विजय बाबासाहेब गायके (वय 19) हा शेतात जातो असे म्हणून घरातून निघून गेला तो परत आला नाही.

याप्रकरणी नेवासा पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. तिसरी बेपत्ता घटना मिना बाळासाहेब पावसे (वय 41) धंदा-घरकाम/शेती रा. पाथरवाला ता. नेवासा यांनी खबर दिली कि, माझी मुलगी कोमल बाळासाहेब पावसे बर्‍याच वेळेपासून घरी नाही.

तिचा गावामध्ये नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News