अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील एका युवकाचा मृतदेह राजुरी येथील विहीरीत संशयास्पदरीत्या आढळला आहे.
याबाबत कुटुंबियांकडुन घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, पिंपरी निर्मळ येथील बाळासाहेब माधव घोरपडे (वय३७) हा युवक शुक्रवार सायंकाळ पासुन गायब होता.
कुटुंबीयांनी त्याचा अनेक ठिकाणी शोध घेतला होता. मात्र तो आढळुन आला नाही. दरम्यान शनिवारी त्याचा मृतदेह राजुरी येथील कॅनलच्या बाजुस असलेल्या गट.नं १३७ मधील विहीरीत आढळुन आला आहे.
अत्यंत मनमिळावु स्वभाव असलेला बाळासाहेब आत्महत्या करू शकतो? याबाबत कुटुंबीयांचा व ग्रामस्थांचा विश्वास बसत नसुन
हा मृत्यु की घातपात याबाबत लोणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी असा अर्ज कुटुंबियांनी दिला आहे. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम