अहमदनगर की बिहार? १२ वाळू तस्करांचा धुमाकूळ ! दांडकी, गजाने हल्ला करत तहसीलदारांची गाडी फोडली, अधिकऱ्यांसह नऊ कर्मचारी जखमी

महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.  यामध्ये या हल्लेखोरांनी तहसीलदारांच्या वाहनाची काचही फोडली आहे. पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर टिपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन टिपर पळून नेले.

Published on -

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातून वाळू तस्करांच्या हौदोसाची बातमी आली आहे. अवैध वाळू उपशास प्रतिबंध करण्यासाठी गेलेल्या श्रीगोंदा येथील महसूल पथकावर चवर सांगवी शिवारातील भीमा नदीपात्रात १२ ते १४ जणांनी पथकावर दांडकी व गजाने हल्ला केला.

या हल्ल्यात पथकातील नऊजण जखमी झाले आहेत. महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.  यामध्ये या हल्लेखोरांनी तहसीलदारांच्या वाहनाची काचही फोडली आहे. पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर टिपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन टिपर पळून नेले. ही घटना शनिवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

रात्री उशिरा प्रांताधिकारी गणेश राठोड व तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थितीत अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद बनपिंप्रीचे कामगार तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिली.

अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांनी महसूल विभागातील नऊजणांचे एक पथक चवर सांगवी येथील सीना पात्रात शनिवारी संध्याकाळी पाठविले होते. पथकाने पाचच्या सुमारास वाळू उपसा करणारा एक जेसीबी, दोन टिपर पकडले. मात्र टिपरचे चालक चाव्या घेऊन पळून गेले. पावणे सहाच्या सुमारास सागर सुदाम बोरुडे हा येथे चार ते पाच जणांना घेऊन आला.

“घोगरगावचे पोलिस पाटील माझा बाप आहे, तुम्ही काय करायचे ते करा”, असे सांगून एक टिपर बळजबरीने घेऊन गेला. त्यानंतर पथकाने तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना माहिती दिली. त्याचवेळी दुसरी १४ ते १५ जणांची टोळी हातात दांडके, गज घेऊन आली. पथकावर हल्ला केला. पथकातील महेंद्र काळे यांना जबर दुखापत झाली. पथकातील इतरही लोक जखमी झाले. त्यांनी टिपर सिनेस्टाइल पळवून नेला.

या हल्ल्यात मिलिंद पोपट जाधव (मंडल अधिकारी, मांडवगण), अनिल शंकर कुंदेकर (मंडल अधिकारी, श्रीगोंदा), भारत नामदेव चौधरी (मंडल अधिकारी, काष्टी), महेंद्र मालन काळे (तलाठी, कोसेगव्हाण), कृष्णा उद्धव गुजर (तलाठी, श्रीगोंदा), संदीप भिवा चाकणे (तलाठी, चांडगाव), ऋषीकेश लक्ष्मण खताळ (तलाठी, मांडवगण), गणपत मुरलीधर झाडे (तलाठी, पिसोरे खांड), शाहरुख रशीद सय्यद (तलाठी, बनपिंप्री) हे जखमी झाले आहेत.

राहुरीत आणखी एक घटना
राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे वाळूचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याच्या चारचाकी वाहनाला ट्रॅक्टरने धडक देऊन आरोपी ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना दि. १९ जून २०२४ रोजी रात्री घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की बाबासाहेब रामजी पंडीत (वय ४७ वर्षे) हे राहुरी येथे कामगार तलाठी म्हणून काम पाहातात. दि. १९ जून २०२४ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास तहसीलदार नामदेव पाटील यांच्या आदेशावरून बाबासाहेब पंडित व कोतवाल योगेश पुंजाहरी झुगे हे चारचाकी वाहनातून आरडगाव येथे चोरटी वाळू वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आरडगावकडुन रोडने आल्याचे दिसले.

तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने ट्रॅक्टर थांबवला नाही. तेव्हा तलाठी बाबासाहेब पंडित यांनी चारचाकी वाहनातून त्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला. तेव्हा ट्रॅक्टर चालकाने पंडित यांच्या चारचाकी वाहनाला धडक देऊन तो ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News