Ahmednagar Politics : अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ ! वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक, विखे कर्डिलेंपासून लंकेपर्यंत…सगळा बेबनाव

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राज्यात महायुतीचे सरकार आहे. पवार – शिंदे – फडणवीस एकत्र आहेत. राज्य लेव्हलला ही युती तयार करून फडणवीस आगामी निवडणुकांचे ध्येय धोरण आखत आहेत.

परंतु अहमदनगर जिल्ह्यातील महायुतीची स्थितीत मात्र पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अहमदनगरमधील राजकारणाचा पुरता ‘गोंधळ’ झाला आहे. वर एक असले तरी अहमदनगर जिल्ह्यात विखे-लंके, कर्डिले-भाजप- राजळे, पिचड-लहामटे असा सगळा बेबनाव आहे.

अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार होते. ती स्थिती आता तशी राहिलेली नाही. सत्तेत असलेला अजितदादा गट मोठा बनला आहे.

शहरात शरद पवार गट आणि उर्वरित ग्रामीण भागात अजितदादा गट एकत्र येईल, असा समान धागा नाही. काँग्रेस व शिवसेनेचे (ठाकरे गट) थिटी कमकुवत झाली आहे. परंतु महायुतीत तर त्यापेक्षा सावळा गोंधळ आहे. वर सत्तेमध्ये भाजप-शिंदे गट-अजितदादा गट एकत्रित असले तरी जिल्ह्यात परस्परविरोधी भूमिका आहेत.

विखे-लंके :- भाजपचे खा. सुजय विखे व पारनेरचे अजितदादा गटाचे आ. निलेश लंके यांच्यात असणार राजकीय वितुष्ट सर्वश्रुत आहे. महायुती असली तरी त्या दोघांचे आरोप प्रत्यारोप मात्र कमी होत नाहीत. आ. लंकेचे नाव लोकसभेसाठी पुढे येत होते. पण युती झाल्याने विखे यांच्यावरील लोकसभा निवडणुकीचा तणाव बराचसा दूर झाला. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांत जे मतभेद आहेत ते डोक्याला ताण देणारे आहेत.

काळे-कोल्हे :- काळे कोल्हे यांच्या घराण्याचे राजकीय वितुष्ठ काही वेगळे सांगायला नको. त्यांच्यामध्ये विस्तव देखील जात नाही. परंतु आता वर महायुती आहे.

पण असे असले तरीअजितदादा गटाचे कोपरगावमधील आ. आशुतोष काळे आणि भाजप माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांतील राजकीय वैर कमी होईल असे वाटतं नाही. विशेष म्हणजे भापचे असूनही विखे – कोल्हे यांमध्ये राजकीय वाद प्रचंड वाढले आहेत. गणेश कारखान्यात निवडणुकीत ते समोर आले आहे.

पिचड – लहामटे :- राजकीय वैमनस्याची समस्या अकोल्यातही आहेच की. अजितदादा गटाचे आ.डॉ. किरण लहामटे व भाजप नेते मधुकर पिचड यांच्यात देखील राजकीय वैर आहे. एकमेकांना विरोध करणं, एकमेकांना इलेक्शन मध्ये पाडणं हे त्यांचं सुरु आहे. आता तर ते एकत्र आले समाज कितपत स्वीकारेल हा प्रश्नच आहे.

विखे जगताप कर्डीले त्रिकुट – भाजप  खा. विखे यांचे या. संग्राम जगताप यांच्याशी सर्वात जास्त सूर जुळले आहेत. तसेच भाजप नेते शिवाजी कर्डीले यांच्याशी देखील त्यांचे संख्या वाढले आहे. सध्या नगरमधील कोणत्याही कार्यक्रमात हे त्रिकुट हाजरी लावतंय. मात्र या त्रिकुटाने नगर शहर भाजपची गोची केलीये.

नव्या-जुन्यांचा ताळमेळ :- भाजप पक्षाला नव्या-जुन्यांचा ताळमेळ घालता येत नाहीये असे चित्र आहे. हे सगळे चित्र महायुतीमधील बेबनाव समोर दाखवणार आहे. वर महायुती पण जिल्ह्यात एकमेकांचे विरोधक अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe