आमदार आशुतोष काळेंनी पाच नंबर साठवून तलावासह विकास कामे केलेली आहेत. परंतु थेट सत्ता असताना ज्यांना पाच वर्षात पाण्यासाठी रुपया आणता आला नाही, त्यांना व त्यांच्या कार्यकत्यांना पाणी प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही.
तेंव्हा अशांनी शहरवासीयांमध्ये संभ्रम पसरवू नये, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे विनोद राक्षे यांना दिला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही सत्तेत असो अथवा नसो, कोपरगावकरांना गढूळ पाणी मिळाले, याचे समर्थन कोणीच करू शकणार नाही.
पालिका प्रशासनाला चुकांचा जाब विचारणे हा आमचा हक्क आहे. तो आम्ही बजावला व बजावणारच, इकडून तिकडून पाणी आणण्याचे गाजर दाखवून पाण्यासाठी सत्ता असूनही माजी आमदारांना रुपया आणता आला नाही. याची खरी पोटदुखी आहे.
याच कारणामुळे कोपरगावकरांनी केलेला पराभव त्यांना आजपर्यंत पचवता आलेला नाही, अशी टीका आढाव यांनी केली आहे. कोपरगावातील रस्त्यांच्या कामासंदर्भात उच्च न्यायालयात जाऊन स्थगिती आणली.
कोपरगावकरांना पाणी मिळू नये याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. यावरून तुम्हाला कोपरगावच्या नागरिकांचा खोटा कळवळा दिसून येतो, असेही ते त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
आ. आशुतोष काळे यांनी गढूळ गाळ मिश्रित पाण्यावरून प्रशासनाला अशा चुका पुन्हा होणार नाहीत, अशी ताकीद दिली आहे. माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रयत्नातून चार नंबर साठवण तलाव दुरुस्तीचे कामाला श्रेयाच्या भीतीपोटी काम होवू दिले नाही. हे देखील कोपरगावकरांना चांगलेच माहित आहे.