Ahmednagar Politics : ‘त्यांची’ कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही

Ahmednagarlive24 office
Published:

आजकालचे पदाधिकारी असलेल्या कृष्णा आढाव यांच्याकडे कोल्हेंवर टीका करण्याची पात्रता नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन केली आहे.

आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. त्यामुळे त्यांना च्यांच्या पदाची ओळख व्हायची आहे. त्यामुळे नवख्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते असलेल्या कोल्हे यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापी सहन करणार नाही.

शहराला स्वच्छ पाणी मिळवून देणे ही आमदारांची नैतिक जबाबदारी आहे. मात्र शहराच्या अवस्थेचे खापर अधिकाऱ्यांच्या माथी फोडून आपली जबाबदारी झटकली आहे.

आता जनतेसमोर पालिकेचे अपयश मांडत आहेत. शहराला गढूळ पाणी देऊन जनतेला आंदोलनाची नौटंकी करून फसवणारे आमदार काळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात समन्वय नाही हे उघड झाले आहे.

नगरपालिकेला नियमांतर्गत मिळणाऱ्या विविध निधीवर आमदार काळे गटाकडून नेहमीच हा निधी आम्हीच आणल्याच्या वल्गना केल्या जातात, असा आरोप काले यांनी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe