अहमदनगर हादरले ! डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, उपचाराचा बहाणा आणि…

Published on -

Ahmednagar News : दवाखान्यात उपचाराचे निमित्त साधून डॉक्टरानेच एका १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आले आहे.

ही घटना रविवारी (दि.११) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगत सदाशिव खाडे (रा. विळद, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक १७ वर्षीय मुलगी उपचारासाठी दवाखान्यात आली.

उपचार करण्याचे निमित्त करून डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केला, तसेच याबाबत दुसरीकडे वाच्यता केल्यास जिवे मारीन, अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीणचे पोलिस उपाधीक्षक संपत भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास भोसले करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe