अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2022 :- महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेला जलसंधारण योजनांपैकी देखभाल व दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परीक्षण व दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबवण्यात येत आहे.
या अंतर्गत श्रीगोंदे अहमदनगर विधानसभा मतदारसंघासाठी जलसंवर्धन योजना अंतर्गत श्रीगोंदे तालुक्यासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये निधी मंजूर झाला असून यातून मतदारसंघातील २५ ठिकाणच्या जलसाठ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
तसेच नगर मतदार संघातील ३ जलसाठ्यांसाठी ७१.४८ लाख रुपये असे एकूण ८ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले.
श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघातील अनेक जलसाठ्यामधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबवण्यासाठी जलसाठा पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनामध्ये श्रीगोंदे तालुक्यासाठी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
जलसाठे यांच्या संवर्धनामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईलच, शिवाय पाणीसाठ्यात वाढ होऊन साठणाऱ्या या पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोग होणार आहे, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम