अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात अवैध सावकारकी अद्यापही सुरूच असल्याच्या घटना घडताना दिसून येत आहे. अशीच एक घटना जामखेडात घडली आहे.
याप्रकरणात एका सावकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावकाराकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी गेलेले पती परत येई पर्यंत आपल्या शेतात गेलेल्या महिलेकडे जाऊन सावकाराचे ”हे शेत मी विकत घेतलेले आहे.
तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणुत फिर्यादी महिलेचा हात धरून, लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले प्रकरणी जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथील महादेव शिवदास खाडे या खाजगी सावकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, डोळेवाडी शिवार या ठिकाणी यातील फिर्यादी महिलेचे पती यांनी मागील 9 महिन्या पुर्वी महादेव शिवदास खाडे या सावकाराकडून १ लाख ७० हजार रूपये मासिक ३ टक्के शेकडा व्याजाने घेतले होते व त्या बदल्यात महादेव शिवदास खाडे यास २५ गुंठे शेती खरेदी करून दिली होती.
सावकाराचे पैसे परत देणे करीता फिर्यादी महिलेचे पती पैसे आणण्यासाठी खर्डा येथे गेले असता यातील फिर्यादी ही शेतामध्ये जनावरे बंधने करीता गेली असता या ठिकाणी महादेव शिवदास खाडे आला व फिर्यादीस म्हणाला की,
हे शेत मी विकत घेतलेले आहे. तुम्ही येथे यायचे नाही असे म्हणुन महिलेचा विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून महादेव शिवदास खाडे रा. डोळेवाडी ता. जामखेड या खासगी सावकारांविरूध्द जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम