अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे. यातच भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या अनेकदा मानवी वस्तीकडे देखील येत असतो. दरम्यान नुकतेच कर्जत तालुक्यातील कोरेगावमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका बिबट्याने वासरावर आणि कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोरेगावमधील बिभीषण मुरकुटे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केला.

यात वासरू किरकोळ जखमी झाले आहे. त्यानंतर शिवाजी सूर्यभान घालमे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बिबट्याने कुत्र्याचा बळी घेतला.
या घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गावामध्ये ऊसाचे पीक जास्त असल्याने शेतकऱ्यांकडून शेतात जाणे टाळले जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरेगावकडे धाव घेतली.
याच अधिकाऱ्यांना वासरु हे किरकोळ जखमी झाल्याचे आढळून आले. हल्ला हा बिबट्याने केल्याचे दिसत असल्याने वनविभाग अधिक सतर्क झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













