या’ ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ; दागिने, रोकड लंपास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- तालुक्यातील निमगाव वाघा या गावात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.

घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. याप्रकरणी दोन जणांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महादेव बाबासाहेब होले (वय 35 रा. निमगाव वाघा) यांचे घरफोडून 35 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने व 27 हजार रूपयांची रोकड चोरीला गेली आहे. नगर तालुका पोलिसांनी याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी फिर्याद अनिता भाऊसाहेब शिंदे (वय 21 रा. निमगाव वाघा) यांनी दिली आहे. त्याच रात्री चोरट्यांनी शिंदे यांच्या घराची कडी तोडून घरफोडी केली.

त्यांच्या घरातून चोरट्यांनी 28 हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी नगर तालुका पेालिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार धुमाळ करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe