नगर तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या ‘त्या’ बिबट्याचा अपघाती मृत्यू!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-रंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ पहाटेच्या सुमारास एका बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.

या भागात रास्ता अपघातात बिबट्याचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या दर्शन देत होता.

त्याने तीन शेळ्या, व एका कुत्र्याचा त्याने फडशाही पाडला होता. त्यामुळे जेऊरकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती.

दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. परिसरात बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वन विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले होते.

आज पहाटे तो नरभक्षक बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला. अखेर भीतीच्या सावटाखाली असलेल्या जेऊरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच पिंजरा लावला असता तर या बिबट्याचा जीव वाचला असता. अशी देखील चर्चा नागरिकांत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe