अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- तहसीलदारांना फोन करून राहुरी तालूक्यातील देसवंडी येथील वाळूचा व्यवसाय बंद केला. त्यामुळे तहसीलदारांना फोन करणारे नंदकुमार गागरे यांना व त्यांच्या कुटूंबाला सुमारे पन्नास जणांनी दहशत करून धमकावले.(Ahmednagar Crime)
ही घटना दिनांक २९ डिसेंबर रोजी तालूक्यातील देसवंडी येथे घडली. याबाबत सुमारे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदकुमार कचरू गागरे यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी नंदकुमार गागरे, त्यांचे वडील, आई व पत्नी हे सर्वजण घरात होते.
त्यावेळी सुमारे पन्नास आरोपी हे हातात काठ्या कुऱ्हाड, कोयते व चैन घेवून आले. ते नंदकुमार गागरे यांना म्हणाले कि, तू आमच्या विरोधात तहसीलदार यांना फोन केल्याने आमचा वाळूचा धंदा बंद झालाय. तू आमचे नादी लागू नकोस. तुझ्यावर खोटे ॲट्रोसीटीचे गुन्हे दाखल करून तूला जेलमध्ये टाकतो.
आज आम्ही पन्नास जण आलो. उद्या पाचशे जण येऊ. तूझा व तूझ्या घरच्यांचा काटा काढू. अशी धमकी दिली. नंदकुमार गागरे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुनील म्हस्के, पप्पू शिंदे, संदीप गायकवाड, रावसाहेब लोखंडे, लखन बापू शिंदे, संतोष जाधव,
भाऊसाहेब रमेश म्हस्के, अविनाश भांबळ, सागर भांबळ, भावा मनोहर म्हस्के, सागर गुंबरे, लखन जाधव, रामा जाधव, अजय चितळकर, बंटी गायकवाड सर्व राहणार तांदुळवाडी, रेल्वे स्टेशन, तालुका राहुरी. तसेच इतर ३९ ते ३५ अनोळखी इसम.
अशा सुमारे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हनुमंत आव्हाड हे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम