अहमदनगर ब्रेकिंग : प्रियसी च्या आत्महत्या नंतर प्रियकराची गळफास घेवून आत्महत्या !

Ahilyanagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी अल्पवयीन प्रियसी मुलीच्या आत्महत्या नंतर काही तासातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली.

एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगी व मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकली नाही.

अशोक बंडु कडु, वय १७, व आशा गोपीनाथ घुले वय १६ दोघे रा. आपटी ता. जामखेड अशी आत्महत्या केलेल्या दोघा अल्पवयीन प्रियकर व प्रियसीची नावे आहेत. या बाबत समजलेली माहिती अशी की दि २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी प्रियकर मुलगी आशा गोपीनाथ घुले वय १६ हीने दुपारी बारा ते एक च्या दरम्यान आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही माहिती याच गावात रहाणार्‍या तीच्या प्रियकर अशोक बंडु कडु वय १७ रा. आपटी यास समजली यानंतर आपल्या प्रियसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर अशोक कडु हा मुलीच्या घरी गेला त्या वेळी आपल्या प्रियसीने आत्महत्या केली आसल्याचे समजले.

या नंतर सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला या नंतर तीचा प्रियकर अशोक कडु या मुलाने देखील व्हॉटसप वर मी देखील माझे जीवन संपवत आहे असा टेटस ठेवला होता.

आणि जे व्हायचे तेच झाले. त्याच दिवशी दि २४ रोजी काही तासातच म्हणजे दुपारी तीन च्या दरम्यान मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या बाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe